संपादकीय
अंबरनाथ-ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा बहुभाषिक विवेधतेने नटलेला ऐतिहासिक राखीव मतदारसंघ म्हणजे अंबरनाथ/उल्हासनगर हा मतदारसंघ २००९ साली राखीव झाला स्थानिक आगरी कोळी कराडी भूमिपुत्राचा भरणा असलेला मतदारसंघ ऐतिहासिक शिवमंदिर ऑर्डनस सारखी भारत सरकारची दारूगोळा कंपनी,जवळच आशिया खंडातील सर्वात मोठी एम.आय.डी.सी औद्योगिक वसाहत देशाच्या व महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेले बहुधर्मीय बहुभाषिक लोक त्यात मुंबई उपनगर शहरातून आलेले अनेक नागरिक वस्ती वाढली की गरजाही वाढत जातात त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल राहणारे २००९ साली शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आलेले तरूण तडफदार,पेशाने डॉक्टर असलेले,लोकाशी दांडगा संपर्क असणारे व मतदारसंघाची ओळख असणारे बौद्ध समाजातील डॉ.बालाजी प्रल्हाद किणीकर निवडून आले आणि या मतदारसंघाचा कायापालट झाला व्यवसायाने दंत चिकित्सक असणारे व मुंबई च्या नायर महाविद्यालयात.काही काळ कार्यरत होते घरची गरीबी व बेताची परिस्थीती असणारे बालाजी किणीकर यांचा जन्म २४ मार्च १९७२ साली मराठवाड्यातील किणी या दुर्गम ग्रामीण खेडेगाव मु.किणी ता.अहमदपूर,लातूर जिल्ह्यात एका गरीब कुटुंबात झाला.
समाज भूषण मा.उतमराव गायकवाड (मुंबई)

पहिल्या पाच वर्षात सर्वधर्म समभाव लोकाशी संपर्क साधला भेडसावीत असणाऱ्या समस्याची माहिती घेतली मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात स्थलांतरित झालेल्याचे प्रमाण असल्याने त्याचा मोठा फायदा डॉ. किणीकर यांना झाला त्यात सामाजिक कार्याची आवड लोकासाठी जे जे करणे शक्य आहे ते करण्याची जिद्द व संबंधित यंत्रणेकडून काम करून घेण्याचा सपाटा लावला सद्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री.एकनाथ शिंदे साहेब व दिवंगत धर्मवीर आनंद दिघे साहेब,स्थानिक शिवसेना शाखा पदाधिकारी यांची मोठी ताकद पाठिंबा असल्याने आपल्या शांत कामसु व सातत्याने लोकाशी जनसंपर्क साधल्या मुळे ते कमी वेळेत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले काम करणारा लोकात मिसळणारा सर्वाना मदत करणारा गोड बोलीचा आमदार म्हणून लोक प्रियता मिळविली त्यामुळे त्यांने मागे वळून पाहिले नाही,पक्ष संघटना नेते शिवसेना पदाधिकारी जनतेचा अशिर्वाद यामुळे २००९, २०१४,२०१९.व २०२४ सलग चार वेळा विजयाची हॅटट्रिक मारत याच मतदारसंघातून निवडून आले,आणि आज ते जवळजवळ १७ वर्षाचा कालखंड पुर्ण करत आहेत,एकाच पक्षाच्या चिन्हावर चार वेळा निवडून आले व लोकसेवक यातच त्यांच्या कामाचे सौख्य दडलेले दिसून तर येतेच पण त्यामध्ये त्यांनी लोकाभिमुख केलेले कामे या जोरावर ते कार्यसम्राट आमदार म्हणून प्रसिद्धी झोतात आले आहेत.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर उल्हासनगर अंबरनाथ येथील विकासाठी आपला फंड तर वापरलाच पण खासदार श्रीकांत शिदे साहेब इतर विधान परिषद आमदार यांच्या ही फंडाचा उपयोग करून घेतला एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर शासकीय निधीचा पाऊस पाडून विविध कामे करून घेतली तर काही प्रगती पथावरआहेत.

उल्हासनगर परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधक रिचर्स केंद्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी साठी बार्टीच्या माध्यमातून संकूल उभारले याचा फायदा मुंबई,ठाणे पालघर आसपासच्या परिसरातील विद्यार्थी यांना संशोधन करण्यासाठी,उच्च शिक्षण घेण्या साठी होणार आहे त्यात अनेक सुखसोई उपलब्द आहेत राहायाला वस्तीगृह आधुनिक तंत्रज्ञान मशिनरी सर्व सोईयुक्त केंद्र गरीब दुर्बल घटकातील मागासवर्गिय यांना शिक्षण घेणे साठी उपयोग होणार आहे. आता या परिसरातून कोणत्याही विद्यार्थ्याला पुणे किंवा इतरत्र जावे लागणार नाही,हजारो विद्यार्थी यांना फायदा होणार आहे (बार्टी,)..त्यामुळे लोकात आनंदाचे वातावरण असून लोक शाबासकी देत आहेत आभार मानीत आहेत. २) बदलापूर अंबरनाथ करांसाठी चिखलोली येथे सत्र न्यायालय,३) ४)मेडीकल कॉलेज, ५)अंबरनाथ येथे आंनद दिघे सुसज्ज नाट्यगृह,व तेथे लोकशाहीर अन्नाभाऊ साठेंचा पुर्णाकृती पुतळा ६)उल्हासनगर सुभाष टेकडी येथे डॉ.बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळ्यासाठी मोठी देणगी,छोट्या मोठ्या बौध्द विहारे,मंदिरे, मस्जिदी,गुरुद्वार उभारण्यासाठी आपल्या आमदार फंडातून किंवा वैयक्तिक मोठ्या प्रमाणात मदत,मतदार संघातील जवळपास सगळ्याच अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांना शालेय साहित्य,पावसाळी छत्र्या,गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत,मतदारसंघातील अडल्या नडलेल्यांची कामे करणे मदत करणे असा कामाचा झपाटा लावल्याने आमदार बालाजी किणीकर मोठ्या प्रसिद्धी झोतात आलेले आहेत.लोकात चर्चा ऐकायला मिळालेला लोकप्रिय लोकाभिमुख आमदार असा असावा तर डॉ.बालाजी किणीकर सारखा डॉक्टर बालाजी किणीकर हे स्वतःहाच एका गरीब कुटुंबातुन वर आलेले आहेत ते एक प्रसिद्ध दंत चिकित्सक आहेत, त्यामुळे त्यांना गरीबीची जान व चांगलीच ओळख असल्याने ते आपल्या अजेंड्यावर माघार घेतांना दिसत नाहीत,अहोरात्र काम करुन त्यांनी जनमानसात आपल्या कामाची चांगलीच छाप पाडली आहे,त्यामुळे ते कार्यसम्राट व लोकांच्या मनातले अचुक प्रश्न गरजा व ज्वलंत समस्या पायाभूत ओळखणारा कार्य सम्राट कार्य तत्पर आमदार म्हणून ओळख निर्माण झाली आहे.अनेक संकाटावर मात करून कामाच्या सपाट्यामुळे एक चर्चेचा विषय बनले आहेत !

डॉ.बालाजी किणीकर यांची लोकप्रियता फक्त मतदार संघा पुरती राहिली नसून मुंबई उपनगर ठाणे ते ग्रामीण मराठवाड्यातील लोकांपर्यंत पोंहोचली आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला तर मराठवाड्यातून मोठी मागणी असते गरजुला मदत करण्यात ते नेहमीच तप्तपर असतात हजारो गरीब व दुर्बल घटकास मदत करणारा आपला आमदार म्हणून त्यांनी ख्याती मिळविली आहे २०२४ ला ते नक्की मंत्री होतील असा मराठवाड्यातील व मतदारसंघातील लोकांना विश्वास वाटत होता परंतु राजकारणात चढउतार होत आसतात त्यामुळे त्यांची वर्णी लागली नाही.अंबरनाथ उल्हासनगरचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या सामाजिक कार्याला सप्रेम जयभीम.
जयभिम ! जय भारत!जय संविधान…!
सन्माननीय आमदार श्री बालाजी किणीकर यांच्या प्रंचड कार्याची दखल घेऊन अभिनंदनाचा वर्षाव करत सदिच्छापर लेख मनोगत….!!
"प्रवासी संचार"
(Passenger Transit Communication)
म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.
Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!