Welcome to प्रवासी संचार   Click to listen highlighted text! Welcome to प्रवासी संचार
https://prawasisanchar.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्र

उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमध्ये फुट पाडण्याचा डाव.

(मुंबई)Dt-17प्रतिनिधी-संतोष क्षेत्रे“प्रवासी संचार“ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गिकरण करून जाती जातीत फुट पाडण्याचा सत्ताधारी भाजपा आणि रा.स्व संघाचा डाव आहे मातंग समाजातील काही आमदार ह्या षड्यंत्राला बळी पडत आहेत उपवर्गिकरणामुळे सर्व अनुसूचित जातींचे नुकसान होणार आहे माजी न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांची समिती असंविधानिक आहे शिवाय ह्या समितीने अनुसूचित जातीतील सर्व घटकांना विश्वासात घेतले नाही त्यांचे मत नोंदवले नाही त्यामुळे ही समिती रद्द करावी व त्यांनी सादर केलेला अहवाल सुद्धा रद्द करावा तसेच नुकत्याच झालेल्या कैबिनेट बैठकीत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागा देता येणार नाही असा निर्णय घेतला आहे हा निर्णय मा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे त्यामुळे हा निर्णय सुद्धा रद्द करावा अशा विविध मागण्यांचे निवेदन उपवर्गिकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने लवकरच मुख्यमंत्री यांना भेटून देण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी दिली आहे

शनिवार दि १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ४-०० वा रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)चे मुंबईतील केंद्रीय कार्यालयात उपवर्गिकरण विरोधी संघर्ष समितीची बैठक ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ह्या बैठकीत माजी राज्यमंत्री मा अविनाश महातेकर,डॉ संदेश वाघ,डॉ सुनिल कदम,प्रा सतीश वाघमारे यांनी विस्तृतपणे उपवर्गिकरणामुळे अनुसूचित जातींच्या होणाऱ्या नुकसानीबाबत माहिती दिली व मार्गदर्शन केले ह्या बैठकीला दलित पँथरचे अध्यक्ष बाळासाहेब पडवळ,रवी गरूड,युथ रिपब्लिकन पक्षाचे सागर संसारे रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे बाबा काळे,सुनिल मोरे,सचीन गायकवाड,ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे मनोहर कटके,सुर्यकांत जगताप,एड सागर लोखंडे,शिवम गाडे,रिपब्लिकन पक्ष खोरिपा दक्षिण मुंबई अध्यक्ष विक्रम कांबळे आदी विविध आंबेडकरी पक्ष संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!