आपला जिल्हामहाराष्ट्र

चित्रपटाला शोभेल असा प्रकार! पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही टोल वसुलीवर प्रश्नचिन्ह सुषमा अंधारे यांचा गंभीर आक्षेप; कागदपत्रे मागताच कर्मचारी पसार झाल्याचा दावा, आमदार सुरेश धस यांनी अधिकाऱ्यांना पाठवले.

 बीड जिल्हा-प्रतिनिधी-गोरख मोरे

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील टोल वसुलीचा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.एखाद्या चित्रपटातील प्रसंगाला शोभेल,अशा पद्धतीने या टोल नाक्यावरील घडामोडी घडल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.टोल वसुलीच्या वैधतेबाबत शंका उपस्थित करत त्यांनी संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील वैद्यकिन्ही येथील टोल नाक्यावर सुषमा अंधारे यांनी थांबून पाहणी केली.टोल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता,त्यांना कोणतेही कागदपत्र दाखवता आले नाही,असा दावा अंधारे यांनी केला आहे.त्यामुळे या टोल नाक्याची वसुली नेमकी कोणत्या अधिकृत परवानगीच्या आधारे सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कागदपत्रांची मागणी अन् कर्मचाऱ्यांची धावपळ ?

सुषमा अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार,टोल नाक्याच्या कामकाजाबाबत संशय निर्माण झाल्यानंतर त्यांनी वाहनातून उतरून तेथील कर्मचाऱ्यांकडे वसुलीशी संबंधित कागदपत्रे मागितली.मात्र,संबंधित कर्मचाऱ्यांना कागदपत्रे सादर करता आली नाहीत,असे त्यांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देण्यासाठी हालचाली सुरू झाल्यानंतर टोल नाक्यावरील व्यवस्थापक आणि कर्मचारी तेथून निघून गेल्याचा आरोपही त्यांनी केला.अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या टोल वसुलीबाबत संबंधित यंत्रणांना माहिती नव्हती का,असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आमदार सुरेश धस यांना फोन; अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुषमा अंधारे यांनी आमदार सुरेश धस यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.त्यानंतर आमदार धस यांनी तातडीने नायब तहसीलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविल्याची माहिती अंधारे यांनी दिली.
आता महसूल प्रशासन आणि संबंधित महामार्ग यंत्रणा या प्रकरणात काय भूमिका घेणार,टोल वसुलीसाठी आवश्यक परवानग्या आहेत की नाहीत आणि प्रत्यक्षात कोणत्या नियमांनुसार वसुली केली जात होती,याची उत्तरे तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहेत.
टोल नाक्याच्या वैधतेची चौकशी होणार का?
वैद्यकिन्ही येथील टोल वसुली अवैध असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला असला, तरी अद्याप या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.संबंधित परवानग्या,करारपत्रे आणि अधिकृत कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
वर्षानुवर्षे सुरू असलेल्या टोल वसुलीमागचे नेमके सत्य काय ? संबंधित यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केले का ? आणि या प्रकरणाच्या चौकशीतून कोणती माहिती समोर येणार ? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाच्या पुढील कारवाईवर अवलंबून आहेत.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!