आपला जिल्हालोकल न्यूज़

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट्स असोशिएशनची स्थापना

(कल्याण)दिं.१३प्रतिनिधी-संतोष क्षेत्रे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजिटल वृत्तपत्र.

कल्याण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा व चळवळी सोबत प्रामाणिक आणि निष्ठावान असणाऱ्या आंबेडकरवादी वकीलांनी सामाजिक बांधिलकी व पे बॅक टू सोसायटी या उदात्त हेतूने एकत्रित येत डॉ.बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट्स असोशिएशनची स्थापना केली असून सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी ॲड. शंकर रामटेके यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या

ॲड.विनोद सोनेकर यांच्या कल्याण(प)येथील कार्यालयात पार पडलेल्या सभेमध्ये कार्यकारिणी गठीत करण्यात आली.अध्यक्षपदी-ॲड.शंकर रामटेके,उपाध्यक्षपदी-१)ॲड.महिंद्र आयगोळे २)ॲड.सोनाली भगत तर सचिव पदी-ॲड.विनोद सोनेकर व सहसचिव पदी-१)ॲड.विलास लांडगे व २) ॲड.आनंद खंडेराव आदींची निवड करण्यात आली.कोषाध्यक्षपदी-ॲड. रविंद्र जावळे,सहकोषाध्यक्षपदी-ॲड. मदन सपकाळ यांची निवड करण्यात आली.महिला प्रतिनिधी म्हणून ॲड. रुपाली कडलग,प्रमुख संघटक पदी-ॲड. अरुण प्रकाश कांबळे तर ॲड.चंद्रकांत कांबळे यांची सहसंघटक म्हणून निवड करण्यात आली.

प्रसिद्धी प्रमुख-ॲड.सचिन वनसाळे,निधी व्यवस्थापक म्हणून १)ॲड.इंद्रपाल सिंह व २)ॲड.सुरेश भगत,अंतर्गत हिशोब तपासणीस-ॲड. दशरथ शेलार यांची तर कार्यकारी सदस्य म्हणून १)ॲड.मनोहर केदारे, २)ॲड.विजय सोनवणे,३)ॲड.दिनेश हुमणे,४)ॲड.मनोज जाधव,५)ॲड.सुरेश अहिरे,६)ॲड.विश्वनाथ तायडे, ७)ॲड.विश्वास घायवट यांच्यासह सल्लागारपदी- १) ॲड.विलास माने २)ॲड.डॉ.अनिता कोळेकर आणि ३)ॲड.पंडित वाघ आदींची लोकशाही मार्गाने निवड करण्यात आली.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!