आपला जिल्हाराजनीति

उल्हासनगर शहरातील क़ायदा सुव्यवस्था व वाढत्या गुन्हेगारी संदर्भात ठाणे पुलिस आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर !

(उल्हासनगर)दिं.५प्रतिनिधी-संतोष क्षेत्रे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजिटल वृत्तपत्र.

उल्हासनगर शहरातील वाढत्या गुन्हेगारी व शहरातील एकंदरीत निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्ना संदर्भात आज उल्हासनगर कांग्रेस अध्यक्ष रोहित साळवे ह्यांनी ठाणे पोलिस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे ह्यांची भेट घेतली तसेच सदर विषय संदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.त्यामध्ये मागील वर्षभरात शहरात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत झाला असून यामध्ये खून, खुनाचे प्रयत्न,मारामारी,चोऱ्या आणि भरचौकात हत्येसारख्या घटना घडत आहेत.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून,महिलांवरील अत्याचार, व्यापाऱ्यांवर टाकली जाणारी दहशत आणि उघडपणे चालणारे बेकायदेशीर प्रकार यामुळे शहराचे वातावरण पूर्णपणे बिघडले असल्या संदर्भात लक्ष वेधले.

शहराची राजकीय परिस्थिती व सत्ता पक्षातील अंतर्गत संघर्ष व गटबाजी आणि काही राजकीय नेत्यांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना मिळणारे संरक्षण,ह्या मूळे देखील शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्या असल्याचे माहिती ह्या वेळस आयुक्तांकडे देण्यात आली.रात्री उशिरापर्यंत (कायद्याने ठरवून दिलेली वेळ ओलांडून)सुरू असणारे रेस्टॉरंट,बिअर बार आणि डान्स बार.मटका, जुगार आणि गावठी दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू असणे.अवैध दारू,अमली पदार्थांची विक्री आणि शहरात सक्रिय असणारे रॅकेट.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणि जामिनावर सुटलेले गुन्हेगार.या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य नागरिक,महिला आणि व्यापारीवर्ग अत्यंत असुरक्षित असुरक्षिततेच्या सावटाखाली जगत आहेत.

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण या प्रकरणी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्या संदर्भात चर्चा करून निवेदन सदर करण्यात आले.सदर निवेदन सदर करताना उल्हासनगर शहर जिला अध्यक्ष रोहित साळवे व वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर धडके हे उपस्थित होते.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!