Welcome to प्रवासी संचार
Click to listen highlighted text!
Welcome to प्रवासी संचार
बीड जिल्हा(प्रतिनिधी–गोरख मोरे)
दिनांक ३१ मे २०२६ रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची (३०१) र्वी शासन आदेशानुसार जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली.

प्रत्येक वर्षी या जयंतीनिमित्त आम्ही चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी जयंती साठी आवर्जून उपस्थित राहतोत,येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शासकीय जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी होते.परंतु यावर्षी दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील ग्रामपंचायत कार्यालय केंद्रीय जिल्हा परिषद शाळा,जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,पशुवैद्यकीय दवाखाना व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धानोरा या ठिकाणी जयंती साजरी करण्याची ठरवले होते, परंतु या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची कसल्याही प्रकारची शासकीय जयंती साजरी करण्यात आली नसल्याचे सामाजिक युवक कार्यकर्ते कुमार टकले (सर) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले.

पुढे सांगितले की,मी ३१ मार्च रविवार रोजी २:०० वाजता धानोरा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संजय एकशिंगे साहेब यांना जयंती साजरी का नाही केली ? असे विचारणा केली असता त्यांनी मला स्पष्ट सांगितलं कि,आज रविवार आहे .त्यामुळे मी काय तिकडे आलो नाही आणि जयंतीचा कार्यक्रम माझ्या लक्षात नाही, मला माहितीच नाही,आणि तिथे कोणी सरपंच ग्रामपंचायत सदस्य,शिपाई यांनी जयंती साजरी केली नाही का ? अशी उलट विचारणा मला एकशिंगे ग्रामसेवक यांच्याकडून करण्यात आली.यानंतर मी केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा येथील मुख्याध्यापक तरटे सर यांच्याशी जयंती संदर्भात विचारणा केली असता त्यांनी पण असेच उत्तर दिलं आज रविवार आहे माझ्या काय लक्षात नाही आणि नंतर परत असं उत्तर दिलं की,तिथे जयंती साजरी केली फोटो टाकतो.त्यानंतर ऑफिसमध्ये आले जयंती कुठे साजरी केली अशी विचारणा केली असता ते येताना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा हातात घेऊन आले होते आणि आत्ता आपण जयंती साजरी करू या प्रकारे उत्तर दिले. त्यावेळी साधारण 2:30 वाजले असतील अशा मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

त्यानंतर मी धानोरा येथील जनता माध्यमिक शाळेत जयंतीनिमित्त विचारणा केली असता तेथील मुख्याध्यापक शिवाजी ढोबळे सर यांनी मी बाहेरगावी आहे माझा एकच दिवस कामाचा शिल्लक राहिलेला असून मी उद्या सेवानिवृत्त होत आहे असे उत्तर दिले.त्यानंतर मी उपप्राचार्य तीपोळे सर यांना संपर्क केला असता त्यांनी बराच वेळ फोन उचलला नाही, नंतर उशिरा उचलल्यानंतर मी शाळेत जयंती साजरी का केली नाही अशी विचारणा करून सांगतो असे उत्तर दिले.

त्यानंतर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा या ठिकाणी गेलो असता तेथील प्राचार्य यांना जयंती बाबत विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली नाही,लक्षात नाही,शेवटी पशुवैद्यकीय दवाखाना येथील कर्मचारी गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तर फोनच उचलला नाही.त्यांनाही राजमाता अहिल्यादेवी यांच्या शासकीय जयंतीचा विसर पडल्याचे या ठिकाणी दिसून आले .
जर अशा अधिकारी/कर्मचारी आपापल्या सवडीनुसार किंवा वेळेनुसार जयंत्या उशिरा साजऱ्या करणाऱ्या वेळेवर न करणाऱ्या राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई का करण्यात येऊ नये ? महापुरुषांच्या जयंती या मुजोर अधिकारी/कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या सवडीनुसार करायचे असतील तर तसा शासनाने जीआर काढावा नसता या मुजोर अधिकारी/कर्मचाऱ्यावर राष्ट्रपुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी,अशी विनंती सामाजिक युवक कार्यकर्ते कुमार टकले(सर) यांनी शासनाला केली.

वरील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांची तक्रार मी बीड जिल्ह्याचे कलेक्टर साहेब,एस.पी साहेब, सी.ईओ साहेब,यांच्याकडे करणार असून आमच्या समाजाचे नेते माननीय विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब व समाजाची बुलंद आवाज गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे या सर्व गोष्टीचे संभाषण व ऑफिस व्हिडिओ चे रेकॉर्डिंग करून पेन ड्राईव्ह व लेखी निवेदन देणार असून व यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनाही पेन ड्राईव्ह व लेखी निवेदन देणार असून अशा मुजोर अधिकारी/कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत रीतसर कारवाई होणार नाही तोपर्यंत माझा हा लढा चालूच राहणार असून गरज पडल्यास आमरण उपोषणही करणार असल्याचे सांगितले असून जर अशाच घटना आपल्या परिसरातील गावात, तालुक्यात/जिल्ह्यात घडल्या असतील तर समाजातील नागरिकांनी सामाजिक चळवळ तयार करून अशा मुजोर कर्मचाऱ्यांना जरब बसण्यासाठी तक्रार करणे गरजेचे आहे. त्याकरिता94 23 38 95 55 या नंबर वरती संपर्क साधावा.मी तुमच्यासोबत सदैव आहे. असे सामाजिक युवक कार्यकर्ते कुमार टकले (सर)यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.
"प्रवासी संचार"
(Passenger Transit Communication)
म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!