Welcome to प्रवासी संचार
Click to listen highlighted text!
Welcome to प्रवासी संचार
बीड जिल्हा प्रतिनिधी(प्रतिनिधी–गोरख मोरे)
नुकत्याच पार पडलेल्या थायलंड येथील एशियन चॅम्पियन कुस्ती स्पर्धेमध्ये ७५ किलो वजनी गटामध्ये भारतातर्फे गोल्ड मेडल मिळवणाऱ्या पै.हर्षल केशव चेमटे यांचे घाटशीळ पारगाव येथील गावकऱ्यांच्या वतीने जंगी सत्कार समारंभ स्वागत करण्यात आले.
या स्वागत कार्यक्रम प्रसंगी घाटशीळ पारगावचे माजी सरपंच तथा शिवसेना बीड जिल्हा उपप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर, विद्यमान सरपंच नवनाथ रामनाथ खेडकर, घाटशीळ पारगाव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक एस.के.खेडकर सर, जि.प. प्राथमिक शाळेचे आर.आर. खेडकर सर, बावी हायस्कूलचे आर.पी. खेडकर सर तसेच नवनाथ भाऊ खेडकर, माजी सरपंच मोहन आप्पा खेडकर, पांडुरंग नेरकर, वैजनाथ खेडकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खेडकर, संतोष घोडके, मारुती अण्णा खेडकर, आजिनाथ खेडकर, बाळासाहेब तात्याबा खेडकर, महादेव लक्ष्मण खेडकर, माजी उपसरपंच राजेंद्र सानप, माजी ग्रामपंचायत सदस्य अंबादास अण्णा खेडकर, माजी उपसरपंच मारुती रघुनाथ खेडकर गावातील सर्व स्तरातील नागरिक /युवक वर्ग /गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन भाऊसाहेब खेडकर यांनी करून पैलवान हर्षल चेमटे याचा मोठ्या थाटामाटात वाजत गाजत गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पैलवान हर्षल चेमटे याच्या कामगिरीने घाटशीळ पारगाव गावाचीच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्याची मान उंचावली असून सर्व स्तरातून पैलवान हर्षल चेमटे याचे अभिनंदन व कौतुक होत आहे .

पैलवान हर्षल चेमटे याने ७५ वजनी कुस्ती घाटामध्ये गोल्ड मेडल मिळवल्याने घाटशीळ पारगावच्या शिरपेच्यात निश्चितच मानाचा तुरा खैवला गेल्याची याप्रसंगी चर्चा रंगली .
"प्रवासी संचार"
(Passenger Transit Communication)
म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!