Welcome to प्रवासी संचार   Click to listen highlighted text! Welcome to प्रवासी संचार
https://prawasisanchar.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gif

नागपूर सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्त श्रीमती सुकेशिनी तेलगोटे यांचे निलंबन करावे !! समाजभूषण उत्तमराव गायकवाड.

मुंबई-दि.१२प्रतिनिधी-गोरख मोरे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

समाजभुषण – उतमराव गायकवाड

दिनांक बारा जून नागपूर लोकमत दैनिकात सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेश बाबतीत मांग व मेहतर या समाजाला विशेष प्रधान्य जाहिरात देवून ५७ मागासवर्गीय घटकात खळबळ उडाली असून शासन फक्त मांग मेहतरला प्राधान्य कसे देऊ शकते याचा जाहिर निषेध करण्यात येत तर आहेच परंतु ऐन उपवर्गिकरण बाबतीत होत असलेला मांग विरोधी ५८जाती घटकात जो संघर्ष शिगेला पोहचला त्यात तेल टाकणारी ही जाहिरात आहे आणि आताच ही जाहीर का हा तेलगोटे यांचा काय हेतू आहे म्हणून सरकारने सुकेशिनी तेलगोटे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते व आबेडकरी चळवळीतील अनुभवी नेते समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी एका पञकाद्वारे महाराष्ट्र सरकारला केली आहे

ही जाहिरात उपवर्गिकरण वादादित संघर्षात तेल ओतावे म्हणून प्रकाशित होणारी जाहीर टाकताना सामाजिक न्याय मंत्री ना.संजय शिरसाठ व विभागाचे प्रधान सचिव डाॅ.हर्षदिप काबळे यांची किंवा इतर वरिष्ठ अधिकारी यांची परवानगी घेतली होती का याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी उत्तमराव गायकवाड यांनी केली आहे.

सरकारला या जाहिरातीमुळे मागासवर्गीय घटकात संघर्ष घडवून आणायचा आहे आहे मांगाला मेहतरला प्राधान्य तर ११९८ असणाऱ्या वसतिगृहातील जागा मांग मेहतरला देऊन टाकाव्यात.श्रीमती तेलगोटे यांना एवढं देखिल समजत नाही सामाजिक न्याय विभागाच्या मुलाच्या वसतिगृहाला महामानव डाॅ.बाबासाहेब आबेडकर यांचे नाव तर मुलींच्या वसहतीगृहाला क्रातीज्योती सावित्री माई फूले देण्याचे आद्यादेश काढून दिले आहे शासनाचा आदेश धुडकाऊन लावला आहे समजत नाही असे म्हणता येणार नाही पण डाॅ.आबेडकर माता सावित्रीबाई यांचा मुद्दाम केलेला घोर अपमान आहे अश्या निष्काळजी अधिकारीवर सरकारने त्वरित कारवाई करावी अन्याथा मागासवर्गीय समाजात कलह निर्माण करु पहाणार्या अधिकारीला दयामाया दाखवू नये अन्याथा येणाऱ्या पावसाळी अधिवेशन काळात आदोलन केले जाईल असाही परखड इशारा शासनाला समाजभूषण उतमराव गायकवाड यांनी दिला आहे.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!