Welcome to प्रवासी संचार   Click to listen highlighted text! Welcome to प्रवासी संचार
महाराष्ट्र

उल्हासनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गतिमान करणार “सिमाताई महेश आहुजा”

(उल्हासनगर)ता.१ मे प्रतिनिधी-संतोष क्षेत्रे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

उल्हासनगर महानगरपालिका जिल्हा राष्ट्रवादी काग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा पदी निवड झाल्या नंतर केला निर्धार राष्ट्रीय अध्यक्ष खा शरदचंद्र पवार साहेब कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या निवडीचे पत्र दिले आहे.

या प्रसंगी खासदार बाळ्या मामा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड महेश तपासे निरिकक्ष उल्हासनगर रविंद्र पवार सरचिटणीस महाराष्ट्र विविध पदाची जबाबदारी पार पाडलेले जेष्ठ नेते समाजभूषण उत्तमराव गायकवाड जेष्ठ कार्यकर्ते महेश आहुजा पत्रकार जगन्नाथ जावळे संपादक प्रवासी संचार उल्हासनगर मधील शेकडो पुरुष महिला कार्यकर्ते व ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

सर्वांनी नवनिर्वाचित अध्यक्षा सिमाताई आठवले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
सिमाताई यांची निवड झाल्यावर विविध पक्षातील कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्या सर्वाचे प्राताध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्वागत केले एक तरुण तडफदार जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणार्या सिमाताई आहुजा यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी प्रमाणे गतीमान दिवस येतील.

असा विश्वास व्यक्त केला आहे उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात विज पुरवठा रस्त्याची झालेली चाळण शहरातील परिसरात घणीचे होत असलेले साम्राज्य वाहतूक व्यवस्था यावर जिल्हा अध्यक्ष म्हणून विशेष लक्ष दिले जाईल प्रसंगी पक्ष रस्त्यावर उतरेल माझ्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडील.

पक्षाची बाधणी बुथ स्तरावर करून सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन पक्षाची बाधणी करीन ज्यांनी यापूर्वी पक्षाचे काम केले आज पक्षा बरोबर आहेत त्या सर्वाना बरोबर घेतले जाईल त्यांचा सन्मान केला जाईल असाक्षी विश्वास सिमाताई यांनी आपल्या छोटे कानी भाषणात दिला सिमाताई पक्षाच्या महिला अध्यक्ष म्हणून काम करित होत्या त्यांच्या पक्षीय कार्याचा सन्मान म्हणून जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे,असे प्रवासी संचार च्या प्रतिनिधीशी बोलतांना सिमाताई आहुजा यांनी सांगितले.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!