Welcome to प्रवासी संचार
Click to listen highlighted text!
Welcome to प्रवासी संचार
सुनिल.ब.गायकवाड (पुणे)
हे पोतराजा …पिढ्यानपिढ्या , युगानुयुगे तू रोज पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव ,शहरे गल्लोगल्ली ,पाठीवर बि-हाड आणि डोईवर मरिआईचा देव्हारा…घेऊन भटकतोस आणि उघड्या अंगावर चाबकाचे फटके स्वतःला मारुन घेतोस कधी तरी मरिआईला सवाल करशील का …?की हे सारे माझ्याच नशिबी का आहे …?उन वारा पाऊस थंडीत हेच चार फटके स्वतःला मारुन घेण्यापेक्षा तूला लाचारीचे जीणं देणा-या व्यवस्थेच्या अंगावर आणि संस्कृती रक्षकांना मारले असते तर तूझ्या पोरांच्या नशिबी हेच जीणं आलं नसतं रे …डोईवर देव्हारा घेऊन नाचण्यापेक्षा संविधान घेऊन नाचला असता तर …?पण त्या वाटेवर तू कधी आलाच नाहीस रे ,तू गेलास धर्माची चाकरी करायला अंधश्रद्धेच्या वाटेवर , त्यांनी संस्कृती रक्षणासाठी तूला धर्माच्या जोखडात अडकवून , संस्कृतीचं लोढणं गळ्यात बांधून,तूझ्या हक्काच्या सरकारी जागा आणि सवलती बळकावून ते साहेब झाले ,काही देश सोडून पळाले तर काहींनी तूझ्या जीवनावर वाघ्या ,मुरळी ,चित्रपट काढून सेलिब्रिटी झाले …अरे संस्कृती रक्षणाचा एवढापुळका होता तर …संस्कृतीच्या दलालांनो तुमच्या पोरां- पोरींना हिरो हिरोईन करण्यापेक्षा …पोरांना वाघ्या करा ,पोरींना मुरळ्या करा ,पोतराज करा ,वासूदेव करा ,पिंगळा करा, देवदासी करा,आणि खुशाल देव धर्म संस्कृती टिकवा की …अडवलंय कोणी …?पण छळ , कपट, षडयंत्र धोकेबाजी ,लबाडी , करण्यात तुम्ही तरलांडग्यांच्या वंशज आहात ,तुमची पोरं परदेशात डॉक्टर इंजिनिअर आणि बहुजनांची वाघ्या मुरळी देवदासी का ?मग कुठल्या निच हलकट संस्कृतीच्या पाऊलखुणा जपताय …?पण गिधाडांनी माणूसकी जपलेली कधी ऐकीवात नाही इतिहास धोकाघडीचाच आहे ,काल ही आणि आज ही.
"प्रवासी संचार"
(Passenger Transit Communication)
म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!