https://prawasisanchar.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधर्मलोकल न्यूज़

आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन.

४ नोव्हेंबर ते११नोव्हेंबर या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा संपन्न होणार .

बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे)

आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी वैकुंठवासी ह.भ.प.श्री.संत बाळूदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीमध्ये करण्यात आले असून या अखंड हरिनाम सप्ताहाचे ४९ वे वर्षे असून यामध्ये पहाटे काकडा,त्यानंतर पारायण,गाथा भजन,प्रवचन,हरिपाठ, हरिकीर्तन व रात्री हरी जागर वरील प्रमाणे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन आहे.

या ठिकाणी ह.भ.प.संग्राम महाराज भंडारे (पुणे)ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पठाडे (कर्जत)ह.भ.प.संदीप महाराज खंडागळे(छत्रपती संभाजी नगर),ह.भ.प. नवनाथ महाराज लिमन (माऊली आश्रम पुणे)हभ.प. भक्तीताई गायकवाड धानोरा(अन्नपूर्णा माता वारकरी शिक्षण संस्था चकलांबा)ह.भ.प.श्वेता दीदी बडे भागवताचार्य (पाथर्डी)ह.भ.प.कबीर महाराज अकतार (शिवचरित्रकार पुणे)रात्री ९ ते ११ या वेळात वरील प्रमाणे कीर्तनकार यांचे कीर्तन होणार आहेत.

बुधवार दिनांक ११नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळात ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे(पुणे आळंदी देवाची)यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे,ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांच्या कीर्तन सोहळ्याची सेवा धानोरा येथील जनता विद्यालयातील एस.एस.सी.२००२ च्या माजी विद्यार्थी बँचने घेतली आहे.

काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाची पंगत धानोरा येथील श्री.किशोर अंबादास शिंगटे यांची होणार आहे.तरी धानोरा सह परिसरातील/तालुक्यातील सर्व स्तरातील भाविक-भक्त/माता-भगिनी/नागरिकांनी येथील अखंड हरिनाम सप्ताह व जगतगुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री.संत बाळूदेव महाराज सप्ताह कमिटी/श्री.संत बाळूदेव महाराज भजनी मंडळ/बाळूदेव महाराज कावड प्रतिष्ठान/धानोरा येथील सर्व तरुण मंडळ व ग्रामस्थांनी केले.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!