आपला जिल्हादेशधर्म

आष्टी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथील जगदंबा देवीचे कोजागिरी पौर्णिमेला यात्रा उत्सवाचे आयोजन.

सर्व स्तरातील नागरिक/माता-भगिनी/भाविक-भक्तांनी यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा-यात्रा उत्सव कमिटी/ग्रामस्थांचे आवाहन.

बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे)

आष्टी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथील नवसाला पावणारी जगदंबा देवीची सालाबाद प्रमाणे याही वर्षी कोजागिरी पौर्णिमेला२५ऑक्टोबर २०२६ रविवार रोजी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले.पिंपरखेड येथील जगदंबा देवी येथे घटस्थापने पासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत १५ दिवस या ठिकाणी मंदिरात दररोज सकाळ-संध्याकाळ आरती/पूजा-पाठ/रात्री भजन आदी विविध कार्यक्रम संपन्न होतात .

जगदंबा देवी ही नवसाला पावणारी असून या यात्रेच्या दिवशी अनेक भाविक-भक्त बोललेले नवस या ठिकाणी या दिवशी पूर्ण करतात.

या ठिकाणी जगदंबा देवीच्या यात्रेला गावासह परिसरातील अनेक नागरिक बाहेरगावी काही काम/व्यवसाय/नोकरी निमित्त गेलेले सर्व सहकुटुंब या यात्रेच्या दिवशी आवर्जून येऊन उपस्थिती दर्शवतात.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासूनच भाविक दर्शन घेण्याला प्रारंभ करतात.या ठिकाणी संध्याकाळी देवी मंदिरापासून पालखीचे प्रस्थान करून गावात आणून तिची गावात मिरवणूक काढली जाते.या प्रसंगी गावातील सर्व स्तरातील नागरिक/माता- भगिनी/आबाल वृद्ध/चिमुकले सर्वजण पालखीचे मनोभावे दर्शन घेतात.ढोल- ताशा/लेझीम पथक या वाद्यात पालखीची गावभर मिरवणूक काढली जाते.या ठिकाणी फटाक्यांची आतीश बाजी केली जाते.रात्री पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळातच पालखीची मिरवणूक संपन्न होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी मारुतीच्या मंदिरा जवळ हज-या घेतल्या जातात.यामध्ये विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.दुपारी जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन केले जाते.दुपारपासून संध्याकाळपर्यंत कुस्तीचे सर्व वयोगटातील सामने होतात.याचा सर्वजण लाभ घेतात.या कालावधीत विविध मिठाईवाले/खेळणेवाले याचा सर्वजण लाभ घेतात.या जगदंबा देवीच्या यात्रेचे वैशिष्ट्ये-गावातील सर्व स्तरातील नागरिक/युवक-वर्ग गट-तट/हेवेदावे/राजकारण सर्व बाजूला सारून या ठिकाणी एकत्र येऊन जगदंबा देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.यात्रा उत्सवाचे अचूक नियोजन यात्रा उत्सव कमिटी कडून शिस्तबद्धपणे केले जाते.

तरी मौजे पिंपरखेड सह परिसरातील सर्व स्तरातील नागरिक-माता भगिनी-भाविक-भक्तांनी जगदंबा देवीच्या रविवारी२५ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या यात्रा उत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन मौजे पिंपरखेड येथील यात्रा उत्सव कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!