Uncategorized
Trending

नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी साबलखेड येथील सफा शेखची निवड.जिल्हा/विभागीय स्तरावर चमकदार कामगिरी.

बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे)

आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील सर्वसामान्य कुटुंबातील सफा शेरअली शेख या विद्यार्थिनीने रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली,वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी जिल्हा /विभागीय स्तरावर आपल्या कौशल्याची छाप पाडत तिने राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी पात्रता मिळवली . तिच्या या यशामुळे मौजे साबलखेडसह आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

जिल्हा क्रीडा/युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि अजिंठा रायफल शूटिंग क्लब,छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हास्तरीय व विभागीयस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत सफा शेख हिने आपल्या नेमबाजी कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.अचूक नेम साधण्याची क्षमता, एकाग्रता आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर तिने दोन्ही स्तरांवर आपली गुणवत्ता सिद्ध केली.या कामगिरीच्या बळावर तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

सफा शेख ही कडा येथील महावीर मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे.अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली.रायफल शूटिंगसारख्या कौशल्य,एकाग्रता आणि संयमाची आवश्यकता असलेल्या खेळात तिने मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद मानले जाते.तिला टीम टॉपर रायफल शूटिंग क्लबचे प्रशिक्षक अहमद पठाण सर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभत आहे.

नागपूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे आव्हान–

सफा शेख हिची निवड दिनांक २२ व २३ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी झाली.या स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून यशाची परंपरा कायम ठेवण्याचा तिचा प्रयत्न राहणार आहे.जिल्हा व विभागीय स्तरावरील यशानंतर आता राज्यस्तरावर आपल्या नेमबाजी कौशल्याची चुणूक दाखविण्याची संधी तिला मिळाली.

आई-वडिलांच्या प्रोत्साहनातून यशाला बळ–

सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत सफा शेख हिने मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असुन तिची आई अंजुम शेख आणि वडील शेरअली शेख हे तिला सातत्याने प्रोत्साहन देत असून तिच्या क्रीडा प्रवासात मोलाची साथ देत आहेत.पालकांचे प्रोत्साहन,प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सफाने राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली.सफा शेख हिने मिळवलेले यश हे तिच्या मेहनतीचे,जिद्दीचे आणि योग्य मार्गदर्शनाचे फलित असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही ती उत्तम कामगिरी करेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!