Welcome to प्रवासी संचार
Click to listen highlighted text!
Welcome to प्रवासी संचार
बीड जिल्हा-प्रतिनिधी-गोरख मोरे.
येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,आष्टी संचलित भगवान महाविद्यालय,आष्टीच्या शैक्षणिक प्रगतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AI & ML) हा अत्त्याधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे.माजी आमदार भीमरावजी धोंडे यांच्या सूचनेनुसार व संस्थेचे प्रशासन अधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे आष्टी तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांचा प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी प्राचार्य डॉ.वाघ यांचे अभिनंदन करताना सांगितले की,त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण व काळानुरूप शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगसारख्या अत्याधुनिक विषयामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्यास मोठी संधी मिळणार असून उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्य विकासालाही चालना मिळणार आहे.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी हा सन्मान संपूर्ण महाविद्यालय परिवाराचा असल्याचे सांगितले.शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांचा दूरदर्शीपणा हा कोर्स महाविद्यालयामध्ये सुरू करण्यामागे दिसून येतो.त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण सर्वजण काम करत असतो.शासनाची मान्यता मिळविण्यासाठी माजी आमदार भीमरावजी धोंडे,प्रशासन अधिकारी,सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन अभ्यासक्रम,संशोधन आणि कौशल्याधारित उपक्रम राबविण्यात येतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"प्रवासी संचार"
(Passenger Transit Communication)
म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!