धर्म

ज्ञानेश कुमार यांचा राजिनामा घ्यावा तसेच आय.आय.टी.मुंबई येथे आत्महत्या केलेल्या साहिल वाकोडेला न्याय मिळाला पाहिजे ह्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे(खोरिपा)दि 2 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आन्दोलन. 

(नागपूर)दिं.२० प्रतिनिधी-गोरख मोरे “प्रवासी संचार” ऑनलाईन डिजिटल वृत्तपत्र.

आज अशोक विजयादशमीच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या (खोरिपा )कोअर कमिटीची बैठक आमदार निवास नागपूर येथे सम्पन्न झाली बैठकीत देशातील सध्यस्थितीवर चर्चा करण्यात आली निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजिनामा द्यावा तसेच निवडणूक मतपत्रिकेद्वारेच घ्यावी,निवडणूक पद्धतीत दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली तसेच आय आय टी पवई मुंबईमध्ये साहिल वाकोडे ह्या बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांची जातीयवादाला कन्टाळून आत्महत्या झाली

ह्या घटनेला एक महिना झाला तरीही ह्या घटनेला जबाबदार असलेल्या प्रा सुर्यनारायण ङुल्लाला निलम्बित केले नाही अट्रॉसिटी कायद्याअन्तर्गत गुन्हा दाखल केला तरीही त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही उलट ह्या जातीयवादी प्रा ङुल्ला याला वाचविण्याचा आय आय टी प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे साहिलला न्याय मिळावा म्हणून आय आय टी च्या आवारात आन्दोलन करणार्या विद्यार्थ्यांना पोलिस अटक करतात आय आय टी प्रशासन ह्या आन्दोलक विद्यार्थ्यांना धमकावतात असे वातावरण आहे रिपब्लिकन पक्षाचे वतीने आय आय टी पवई आन्दोलन केले परन्तू अद्यापही आय आय टी प्रशासनाने जातीयवादी प्रा ङुल्लावर कारवाई केलेली नाही त्यामुळे साहिल वाकोडेला न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा)वतीने दि 2 नोव्हेंबर 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा देशक खोब्रागडे यांनी सांगितले आहे बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन डिसेंबर महिन्यात वर्धा येथे आयोजित करण्याचे ठरले आहे बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मा डॉ एन व्हि ढोके, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे, कार्याध्यक्ष डॉ देवेश काम्बळे,उपाध्यक्ष सी एम रामटेके,विदर्भ प्रदेश अध्यक्ष सी पी रामटेके,के का स दिगंबर वाकोडे, विनायकराव ताकसांडे, चरणदास नन्दागवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी दिली आहे

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!