महाराष्ट्रराजनीति
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा…! केन्द्रीय समाज कल्याण मंत्री-रामदास आठवले.

नवी मुंबई दि.३ऑक्टोबर:-प्रतिनिधी-राहुल हंडोरे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षते खाली विष्णुदास भावे सभागृह, वाशी नवी मुंबई येथे उत्साहात पार पडला.
अध्यक्षपदावरून बोलतांना ना.रामदास आठवले म्हणाले की, महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी मुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले.शेवटी शेवटी पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके करपून जळून गेली यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असून या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मदत करा असे आवाहन रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.
ना.आठवले पूढे म्हणाले की,रिपब्लिकन पक्ष २८ राज्यात पसरला असून मिझोराम, त्रिपुरा,मणिपूर आदी.राज्यात पक्ष वाढत असून नागालँड प्रदेशात रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या १०% आरक्षण मिळाले आहे.गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे.निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागा परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेडे वाकडे बोलू नका असे आठवले म्हणाले.
वर्धापन दिन कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे, माजी मंत्री अविनाश महातेकर,राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे,बाबुराव कदम, सिमाताई आठवले,सुरेश बारसिंग,पप्पू कागदे, निकाळजे,काकासाहेब खंबालकर,कांतीलाल जैन, परशुराम वाडेकर,सिद्धार्थ कासारे,आण्णासाहेब रोकडे, अशोक गायकवाड,प्रकाश मोरे,बाळू बोर्डे,शिलाताई गांगुर्डे,अभया सोनावणे, संगीता आठवले,आदीची भाषणे झाली.संविधान तज्ञ् ऍड.दिलिप काकडे आणि प्रा.डॉ.विजय खरे यांनी विशेष मोलाचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.








