Welcome to प्रवासी संचार
Click to listen highlighted text!
Welcome to प्रवासी संचार
उल्हासनगर (विशेष प्रतिनिधी) दि.१ ऑगस्ट २०२६
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे स्मारक समिती,उल्हासनगरतर्फे लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.हा भव्य जयंती उत्सव १ ऑगस्ट रोजी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे तालुका क्रीडा संकुल (दशहरा मैदान)उल्हासनगर ५ जि.ठाणे येथे संपन्न झाला.

या सोहळ्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूरचे प्रा.सुकुमार कांबळे आणि नांदेडचे प्रा. रामचंद्र भराडे उपस्थित होते.त्यांनी आपल्या प्रबोधनात्मक विचारांमधून डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर,साहित्यावर आणि सामाजिक संघर्षावर प्रकाश टाकला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.यामध्ये:
स्वागताध्यक्ष: नरेश गायकवाड
अध्यक्ष (स्मारक समिती)डॉ.जानु मानकर
अध्यक्ष (जयंती उत्सव): प्रकाश खंडागळे
कार्याध्यक्ष: राजेंद्र अडांगळे
सचिव: राधाकृष्ण साठे
या सर्व पदाधिकाऱ्यांसह स्मारक समितीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे आणि वैचारिक प्रबोधनाचे वातावरण निर्माण झाले होते.
"प्रवासी संचार"
(Passenger Transit Communication)
म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!