https://prawasisanchar.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्र
एस.टी.च्या सेवानिवृत्तांचे नंदुरबार येथे वार्षीक अधिवेशन रत्नपाल जाधव यांजकडुन.
विनित-प्रसिद्धी प्रमुख-रत्नपाल जाधव-7021351763

(नंदुरबार)दि.९जुन.२०२६ प्रसिद्धी प्रमुख-रत्नपाल जाधव“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
मा.सदानंद विचारे साहेब
सरचिटणीस रा.प.निवृत कर्मचारी संघटना (महाराष्ट्र)
सरचिटणीस सदानंद विचारे यांच्या नेतृत्वाखाली असणारी राज्य परिवहन कर्मचारी संघटना ही एस.टी च्या सेवानिवृत्तांची एकमेव मान्यताप्राप्त संघटना.या संघटनेचे वार्षीक दोन दिवसीय अधिवेशन दिं.१२/१३ जुन रोजी संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीराम गलेवाड यांच्या अध्यक्षते खाली राज्याची दक्षीण काशी म्हणुन ओळखल्या जाणार्या नंदुरबार या जिल्ह्यात गजानन महाराज मंदीर, कोकणी हिल बस स्टाॅपजवळ,नंदुरबार येथे संप्पन्न होत आहे.या दोन दिवसीय वार्षीक सभेमध्ये गेल्या वर्षभरात विविध विभागात झालेल्या केंद्रिय कार्यकारिणीसभा,उच्चाधिकार समिती व पेन्शन कमिटीच्या बैठका तसेच प्रादेशिक चिंतन बैठक मेळावे यामध्ये सर्वानुमते झालेले निर्णय,संघटनेची भविष्यातील वाटचाल,सन२६ ते २९ च्या केंन्द्रीय कार्यकारिणीस मंजुरी देणे,पेन्शन बाबत अभ्यासु असलेल्या सेवानिवृत्तांची समितीत निवड करणे याबाबत चर्चा होईल व संघटनेने आता पर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येईल असे राज्य प्रसिद्धी प्रमुख रत्नपाल जाधव यांनी सांगितले..

एस.टी प्रशासन व भविष्य निर्वाह निधी कार्यालया मध्ये ईपीएस ९५ बाबत प्रशासकीय शुल्क भरावे लागु नये म्हणुन न्यायलयीन खटला सुरु आहे या बाबत उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,मुख्य विधी सल्लागार यांच्याशी चर्चा करुन संघटना मार्ग काढण्याचा प्रयत्नात असल्याचे सरचिटणीस सदानंद विचारे यांनी सांगताना भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे काम अतिशय संथगतीने चालु असल्याचे म्हटले आहे.राज्यभरात अनेक विभागात पेन्शनचे दावे निकाली काढण्यात येत नाहीत त्यात आक्टोबर २०२५ पासून भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने संगणकीय पद्धतीने प्रशासकीय शुल्क भरायला सांगितल्यामुळे पेन्शन सूरू झालेल्या नाहीत.एकीकडे कोर्टाने महामंडळास प्रशासकीय शुल्क न भरण्याचे आदेश दिलेले असताना भविष्य निधी कार्यालय मात्र आडमुठेपणाचे धोरण अवलंबुन कोर्टाचा अवमान करत आहे,महामंडळाने पेन्शन कार्यालया विरोधात अवमान याचिका दाखल केलेली आहे अशी माहिती विचारे यांनी दिली.
संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहेच परंतु भविष्यात आंदोलनात्मक भुमिका घेण्याबाबतही अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे सरचिटणीस सदानंद विचारे यांनी सांगितले.





