आपला जिल्हाराजनीति

चारा छावण्या नकोत-थेट शेतकऱ्यांच्या दारात चारा-पाणी द्या शिरूर कासार तहसीलदारांना निवेदन.

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचा प्रशासनाला थेट इशारा

बीड जिल्हा(प्रतिनिधी–गोरख मोरे)

शिरूर कासार तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून शासन स्तरावर चारा छावण्या सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या,परंतु भूतकाळातील कटू अनुभव पाहता,चारा छावण्यांमध्ये छावणी चालकांकडून बोगस जनावरे दाखवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आले.तर मूळ गरजू पशुपालक शेतकरी मात्र चाऱ्यापासून वंचित राहतात चाऱ्याच्या वाटपावरून शेतकऱ्यांची हेळसांड होते व आपापसात वाद-विवाद होतात.या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि प्रत्येक मुक्या जनावराला हक्काचा चारा मिळण्यासाठी प्रशासनाने खालीलप्रमाणे तत्काळ पावले उचलावीत.

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी)मंडळ अधिकारी,ग्रामसेवक व पशुधन विकास अधिकारी यांच्यामार्फत स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष जागेवर जाऊन खरी पशुधन गणना करावी.चारा छावण्यांचे ठेके देऊन दलालांचे खिसे भरण्याऐवजी, थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत/दारापर्यंत चारा आणि पाण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी.       

प्रशासनाला इशारा

शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय तातडीने न घेतल्यास,शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे,युवासेना प्रमुख मा. आदित्यजी साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार मा. अंबादासजी दानवे,सौ. सुषमा ताई अंधारे,बीड लोकसभा संपर्कप्रमुख अशोकजी सकपाळ, जिल्हाप्रमुख उल्हासभैय्या गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिरूर कासार तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांनी दिला.

               निवेदनकर्ते

सोपान(काका)मोरे(तालुकाप्रमुख,शिवसेना उबाठा, शिरूर कासार)आदिनाथ (भाऊ)खेडकर(उपजिल्हाप्रमुख,आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघ),समस्त शिवसैनिक व शेतकरी बांधव शिरूर कासार.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!