Welcome to प्रवासी संचार   Click to listen highlighted text! Welcome to प्रवासी संचार
https://prawasisanchar.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्र

भटके विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

(मुंबई)दिं.२जुन२०२६ प्रतिनिधी-मनीलाल डांगे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तपत्र.

भटके विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज मंगळवार दिनांक २ जून २०२६ रोजी भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात भेट घेऊन विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.

सकारात्मक विचार करून भटके विमुक्त समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची नेमणूक करून समाजाचे प्रश्न समजून घ्यावे तसेच तळागाळातील लोकांच्या रोजगाराची समस्या जाणून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून भटके विमुक्त समाजातील मजूर काम करणाऱ्या लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.

भटके विमुक्त समाजाच्या विविध मागण्या मान्य झाल्या किंवा नाही यासंदर्भात दर तीन महिन्यांनी आढावा बैठक आयोजित करण्यात यावी अशी विनंती याप्रसंगी करण्यात आली.
मा चंदू दादा पाटील(मच्छीमार सेल प्रदेश अध्यक्ष)तसेच सौ.सविता विनोद चव्हाण यांच्या पुढाकाराने सदर शिष्टमडळाचे नेतृत्व भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी केले,सौ कस्तुरी कौस्तुभ राणे (महिला संघटक,भटके विमुक्त सामाजिक संस्था)सुरेश चव्हाण (नवि मुंबई अध्यक्ष,भटके विमुक्त सामाजिक संस्था)प्रवासी संचार चे प्रतिनिधी  मनीलाल डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!