Welcome to प्रवासी संचार   Click to listen highlighted text! Welcome to प्रवासी संचार
https://prawasisanchar.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gif
Trending

उपवर्गीकरणाबाबत आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे-समाजभूषण उत्तमराव.

(धारावी मुंबई)दिं२६प्रतिनिधी,संतोष क्षेत्रे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक वर्ग समूह व घटकाला आपले हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले असून त्या आधारानेच न्याय,बंधुत्व व समता प्रस्थापित करण्याचे महान काम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असल्याने स्वतंत्र भारताची स्वतंत्र घटना ही सर्वसमावेशक असताना तिच्यातील काही बाबींमध्ये बदल करण्याचा जो प्रयत्न सध्या शासन पातळीवरून सुरू आहे.तो घटनेच्या विरोधात तर आहेच परंतु भविष्यात मागासवर्गीयांच्या जवळपास ५८ जातीच्या विरोधात कलह निर्माण करणारा असल्याने या बाबत राज्यातील आंबेडकरी चळवळीतील काही नेते मौन पाळून असून त्यांनी एकत्र येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी परिणामी विपरीत परिणाम होताना दिसत आहे.

मांग समाजाकील कार्यकर्ते नेते आम्हाला या बौद्ध नेत्याचा पाठिबा आहे त्या नेत्याचा पाठिबा आहे प्रचार करून बौद्ध समाजाची धुळफेक करित आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सागितले आहे.माटुंगा लेबरकॅम्प येथील आंबेडकर भवनात झालेल्या उपवर्गिकरण विरोधी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होेते मेळाव्याच्या अध्यक्ष पदी चर्मकार महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने होते तर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आगरी समाज नेते राजाराम पाटील चर्मकार नेते सूर्यकांत गवळी मा आमदार बाबुराव माने समाजभूषण सो.ना कांबळे,संजय भालेराव,शारदा नवले,पायल खरे विलास गोरेगाव कर,जगन्नाथ धमापूरकर,गणेश खिल्लारे,शारदा बर्डे,स्वाती बर्डे आदीची मार्गदर्शक भासणे झाली मोठ्या संख्येने तर्मकार बाधव उपस्थित होते या बाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की.

३० जूनला उपवर्गिकरणा विरोधात निघणार्या मोर्चात आमच्या पशातील आंबेडकरी जनता सामिल होणार पुढे ते म्हणाले की भारतीय घटनेच्या संविधानामध्ये आरक्षण विषयावर कलम ३४० नुसार नागरिकाचा मागास प्रवर्ग(ओबीसी) या घटकांना कलम ३४१ नुसार मागासवर्गीय घटकातील अनुसूचित जातींना (एस सी)व कलम ३४२ नुसार अनुसूचित जमातीना (एस टी) या वर्गसमूहाना आरक्षण दिलेले असून त्या वेळी डॉ बाबासाहेबांनी आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण आहे. त्यातील कलम ३४१ मध्ये५९ जातीना समाविष्ट करण्यात आले असून भारतीय संविधाचा ७५ व सुवर्ण महोत्सव साजरा झाल्यानंतर कलम ३४१ मधील५९ जातींपैकी मांग या जातीमधील वर्ग समूहातील काही तथाकथित राजकीय पुढाऱ्यांनी याच कलम ३४१ मधून आरक्षण घेत असलेल्या महार (बौद्ध)समाजाकडे बोट दाखवत याच समाजाने घटनेतील आरक्षणाचा जास्तीत- जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न केला

असल्याबाबतचा आरोप ठेवत अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गिकरण करून आम्हाला अ ब क ड करून त्यामधून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे ही मागणी गेली अनेक महिन्यापासून सुरू असून ते झालेच पाहिजे या विषयासाठी मोठा आटापिटा चालू असून व ते होऊच नये म्हणून आंबेडकर चळवळीतील राज्यातील असंख्य नागरिक नेत्याविना रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना दिसून येत असून या प्रमुख विषयाकडे राज्यातील सर्वच आंबेडकरी चळवळीतील विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने ती भूमिका नेत्यांनी स्पष्ट करून गटतग विसरून एकत्र नेतृत्व करावे महारानी आमचे हक्क पळविले सवलती वर दरोडा टाकला आमचा विकास रोखला असा आरोप मांग समाजातील काही भाजपा आर.एस.एस धार्जीणी मंजळी करितअसून ती धांडात खोटी आहे

मांगाला शिक्षणा पासून विकासापासून शैक्षणिकदृष्ट्या कधीही रोखले नाही शैक्षणिक मांगाची मानसिकताच राहिलीच नाही म्हणून विकास थांबला गुणवत्ताच मिळविली नाही कसे पोर साहेब होणार मनुवादी जटील परंपरेत मांग आजही गुरफटले गेला मांगासाठी सरकारने स्वतंत्र अण्णाभाऊ साठे महामंडळ केले त्याचा फायदा करू शकले नाही बार्टी तून आर्टी अलग केली तेथे तर विद्यार्थी मिळानेत झाले मागासवर्गीयामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे याचे मनन मांगाने कोले पाहिजे असिच फूट पडत गेली तर सर्व आरक्षच कालांतराने सरकार बंद करू शकते हा धोका मांगाने लक्षात घ्यावे असेही गायकवाड म्हणाले चर्मकार बांधव हा उपवर्गिकरण विरोधी मोर्चा यशस्वी करण्साठी माजी खासदार बबनराव घलप माजी आमदार बाबुराव माने व ईतर नेते ताकतीने उतरले आहेत त्याचे अभिनंदन. म्हणून सर्व बौद्ध नेते जनतेने प्रचंड संख्येने उतरावे व मांगाना पुढे करून उपवर्गिकरणावर येत असणारे संकट टाळावे सरकारने ही मांगाची फोडाफोडाीची मागणी फेटाळून लावावी एका वर्गासाठी ५८ जनजातीवर अन्याय करू नये अशीही मागणी शेवटी गायकवाड यांनी केली आहे.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!