शिरूर कासार येथील स्टेट बँकेचे कर्तव्यदक्ष आणि अगत्यशील मॅनेजर श्री.प्रवीणजी हासे सर यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
शिरूर कासार येथील बँकेत येणारा प्रत्येक ग्राहक,मग तो सामान्य खातेदार असो,ठेवीदार असो,नवीन खाते उघडणारा तरुण असो,पैशांची देवाणघेवाण करणारा असो, किंवा बँकेत येणारे वृद्ध-शेतकरी असोत..हासे सर प्रत्येकाशी अत्यंत आपुलकीने, आदराने आणि नम्रतेने वागतात.त्यांच्या याच अगत्यशील आणि ग्राहकभिमुख सेवेची दखल घेऊन,त्यांना ‘शेतकरी सन्मान चिन्ह’ देऊन गौरविण्यात आले.
भव्य सत्कार सोहळा आणि नियोजन–
या कौतुकास्पद सोहळ्याचे नेटके नियोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान(काका)मोरे/शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजिनाथ (भाऊ)खेडकर यांच्या वतीने करण्यात आले.शिवसैनिकांच्या व शिरूर कासार तालुक्यातील व्यापारी बांधवांच्या आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत जल्लोषात थाटामाटात पार पडला.
“शिरूर कासार तालुक्यात सर्वसामान्य जनतेसाठी चांगलं आणि प्रामाणिक काम करणाऱ्या प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याचा व कर्मचाऱ्याचा शिवसेना आगामी काळातही असाच जाहीर सत्कार करून त्यांचा गौरव करणार!”असल्याचे शिरूर कासार शिवसेना तालुका प्रमुख सोपान(काका)मोरे उपजिल्हाप्रमुख अजिनाथ(भाऊ)खेडकर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. चांगल्या कामाची पावती आणि प्रामाणिकपणाचा सन्मान करणाऱ्या शिरूर कासार येथील शिवसेनेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.